एलॉन मस्कचा निर्णायक डाव ! श्रीलंकेच्या कर्जाऐवढा पैसा रोख मोजून ट्विटरचा मालक होणार ? | पुढारी

एलॉन मस्कचा निर्णायक डाव ! श्रीलंकेच्या कर्जाऐवढा पैसा रोख मोजून ट्विटरचा मालक होणार ?

न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ट्विटर खरेदीच्या चर्चेला जवळपास पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. जगातील गर्भश्रीमंत आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क ट्विटर खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ट्विटरने याबाबत जवळपास तयारी केली आहे.

तब्बल ४३ बिलीयन डॉलर रोखीने देऊन एलॉन मस्क ट्विटरचे मालक होतील अशी चिन्हे आहेत. सोशल मीडिया कंपनीसाठी ही सुंदर आणि अंतिम ऑफर असल्याचे या डीलमध्ये जवळचा संबंध असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.

प्रती शेअर ५४.२० डॉलर या प्रमाणे ट्विटर व्यवहार करण्याची शक्यता

कदाचित याबाबत आज उशिरा घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रती शेअर ५४.२० डॉलर या प्रमाणे ट्विटर व्यवहार करण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या भागधारकांना विक्रीची माहिती देण्यासाठी बोर्डाची बैठक होणार असून यामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थात, अगदी शेवटच्या क्षणी जवळपास निश्चित झालेली डील रद्द सुद्धा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

फोर्ब्जच्या यादीनुसार एलॉन मस्क जगातील गर्भश्रीमंत आहेत. एलॉन मस्क त्यांच्या वैयक्तिक क्षमतेवर ट्विटर खरेदीची चाचपणी करत आहेत. यामध्ये ते सीईओ आणि मालक असलेल्या टेस्ला कंपनीचा काहीही संबंध नाही.

सूत्रांनी सांगितले की ट्विटरने मस्क यांच्यासोबत केलेल्या करारांतर्गत ‘गो-शॉप’ तरतूद अद्याप सुरक्षित केलेली नाही, ज्यामुळे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इतर बोली मागवता येतील. तरीही, ट्विटर मस्क यांना ब्रेक-अप फी भरून दुसर्‍या पक्षाकडून ऑफर स्वीकारण्याची परवानगी दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, व्यवहार गोपनीय असल्याने सूत्रांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. दरम्यान, ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

अमेरिकन शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम

एलॉन मस्क ट्विटरवर मालकी मिळवण्याच्या चर्चेनंतर अमेरिकन शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. तब्बल साडे चार टक्क्यांनी शेअर वधारून तो ५१.१५ डॉलरवर पोहोचला.

एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, ट्विटरला वैयक्तिकरित्या वाढण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक वास्तविक व्यासपीठ बनण्याची आवश्यकता आहे.

एलॉन मस्क खरेदीची तयारी दाखवल्यानंतर चार दिवसांमध्येच प्रस्तावित डीलची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ट्विटर बोर्डलाही यामुळे अधिक गंभीरपणे विचार करण्यासाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे डील मोडली जाणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असेही शेअरधारकांना सांगितले जाईल. यापूर्वी वॉरेन बफेट यांनीही ट्विटर खरेदीची तयारी दाखवली होती.

हे ही वाचलं का ?

Back to top button