Mumbai Airport :’अदानी एअरपोर्ट’ फलक शिवसैनिकांनी उखडून फेकला! | पुढारी

Mumbai Airport :'अदानी एअरपोर्ट' फलक शिवसैनिकांनी उखडून फेकला!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Mumbai Airport : राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असा फलक लावला. यानंतर अखिल भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी उखडून फेकला. मुंबई विमानतळावर अदानींचे नामफलक झळकल्याने शिवसैनिक संतप्त झाले.

देशातील सात आंतरराष्ट्रीय विमानतळांचा ताबा अदानी समूहाकडे आहे. अलीकडेच मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा सुद्धा जीव्हीकेकडून अदानी समूहाकडे आला आहे. ताबा आल्यानंतर अदानी समूहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच अदानी एअरपोर्ट असा फलक लावला होता.

यानंतर या बोर्डवर शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानी फलक झळकल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर व्यक्त केली होती. खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

हे ही वाचलं का?

Back to top button