महाराष्ट्रावरील वीजटंचाईचे संकट टळणार, अतिरिक्त वीज खरेदीचा निर्णय, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

महाराष्ट्रावरील वीजटंचाईचे संकट टळणार, अतिरिक्त वीज खरेदीचा निर्णय, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वीजटंचाईमुळे राज्याच्या काही भागात भारनियमन सुरू झाले आहे. अतिरिक्त वीज खरेदी केली नाहीतर हे भारनियमन आणखी वाढण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी तातडीची वीज खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. यामध्ये राज्यासाठी अतिरिक्त वीज खरेदी करत भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत राऊत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, कडाक्याच्या उन्हामुळे चढलेला पारा उतरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यभर विजेची मागणी वाढली. सध्याची मागणी 28 हजार मेगावॅटची असून ती ३० ते ३२ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

तूर्तास १५०० मेगावॅट विजेची टंचाई राज्यात निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारनियमन वाढवण्याची शक्यता होती परंतु मंत्रीमंडळाच्या बैठकीत अतिरिक्त वीज खरेदी करत राज्यावर असलेले भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय झाला.

राऊत पुढे म्हणाले की, आम्ही सर्व ऊर्जा प्रकल्प सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या आपल्या १७ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. राज्यात कोळसा मिळवण्यासाठी आपची चर्चा सुरू आहे. गुजरात तामीळनाडू यासह अन्य राज्यातही कोळशाचा तुटवडा असल्याने तिथेही भारनियमनाचे संकट आहे.

आज राज्यात २८ हजार ७०० मेगावॅट पर्यंत आहे. तो भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. याचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला बाहेरून विज विकत घ्यावी लागणार आहे ती आम्ही अल्प काळासाठी घेणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले. केंद्र आणि राज्याचा समन्वय असल्याने आम्ही भारनियमन कमी करण्यासाठी रोज अपडेट घेत असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news