किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे तुम्ही सांगता की मी बोलू, पण तो नंदकिशोर चतुर्वेदी आहे तरी कोण ? | पुढारी

किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे तुम्ही सांगता की मी बोलू, पण तो नंदकिशोर चतुर्वेदी आहे तरी कोण ?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यातील सरकारच्या मागे लागलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठा दणका देत ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत 06 कोटी 45 लाख रुपये आहे. पाटणकर यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक बुलियन आमी ग्रुप ऑफ कंपनीच्या विरोधात मार्च 2017 मध्ये काळ्या पैशांविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुष्कक बुलियन्सची तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ही मालमत्ता महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित होती.

महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदीच्या संगनमताने पुष्पक समूहातील पुष्पक रियल्टीचा निधी हस्तांतरीत केला. पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली हा निधी हस्तांतरित केला होता. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना 20.02 कोटी रुपयांचे हस्तांरण करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी आहे तरी कोण ?

नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एन्ट्री ऑपरेटर असून त्याने हमसफर डिलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे विनातारण कर्ज श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करुन हा पैसा महेश पटेल याने पळविला आणि पूढे तो श्री साईबाबा गृहनिर्मीती प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम प्रकल्पात गुंतविण्यात आला. याच वळत्या करण्यात आलेल्या पैशातून या 11 सदनिकांची खरेदी केली केल्याचे बोलले जाते. दरम्यान, श्रीधर पाटणकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू असून ते एक व्यावसायिक आहेत. ईडीच्या कारवाईने मात्र पून्हा एकदा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनी मिळून २०१४ मध्ये एक कंपनी स्थापन केली. कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज नावाच्या या कंपनीत 50-50 टक्के शेअर्स आई आणि मुलाचे होते. कंपनीचे संचालक तेजस ठाकरे (आदित्य ठाकरे यांचा भाऊ) होते. आता त्या कंपनीचा मालक नंदकिशोर चतुर्वेदी आहे. हाच हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी बनावट कंपनीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहे.

दरम्यान, नंदकिशोर चतुर्वेदीने ईडीच्या कारवाईनंतर देशातून पलायन केल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. चतुर्वेदीच्या मागावर ईडी असून त्याचा शोध घेत आहे.

वसुलीचा पैसा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या मेहुण्यांमार्फत पोहोचतो का ?

हा बीएमसीच्या लुटीचा आणि वसुलीचा पैसा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या मेहुण्यांमार्फत पोहोचतो का ? CM ठाकरे यांनी स्वतः सांगावे की त्यांचे त्यांच्या मेव्हण्याशी केवळ कौटुंबिक संबंध आहेत की आर्थिक संबंध आहेत? हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीशी त्यांचे काय नाते आहे, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे ? किरीट सोमय्या म्हणाले की, मनी लाँड्रिंग, हवाला आणि घोटाळ्यात ठाकरे कुटुंबाचा संबंध समोर येण्याची ही पहिलीच घटना नाही. 11 नोव्हेंबर 2020 रोजी मी एक पीसी केला, ज्यामध्ये मी अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबातील जमिनीच्या व्यवहाराविषयी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button