

मुंबई पुढारी ऑनलाईन : अन्यायाविरुध्द लढणे हीच महाराष्ट्राची वृत्ती आहे. मी नौदलाच्या कार्यक्रमासाठी आलाे असल्याने येथे राजकीय भाष्य करणार नाही. मात्र 'ईडी'कडून सुरु असलेल्या कारवायांबाबत विधानमंडळात बाेलणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.
शहीद दिनानिमित्त (Martyrs Day) नौदलाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांची उपस्थिती हाेती. यानंतर बाेलताना ते म्हणाले, " अन्यायाविराेधात लढणे हीच महाराष्ट्राची वृत्ती आहे. भारतीय सैन्यदलातील जवान व अधिकारी देशासाठी देत असलेली सेवा अतुलनीय आहे. भारतीय नाैदलाचे महाराष्ट्र आणि मुंबईबराेबर असलेले नाते अनोखे आहे".
मंगळवार, २२ मार्च राेजी आदित्य ठाकरे यांचे मामा श्रीधर पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ फ्लॅट्सही जप्त केले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, " हे भारतीय नाैदलाचे ठिकाण आहे . मी इथे राजकीय भाष्य करणं चुकीचं आहे. मी नौदलाच्या कार्यक्रमासाठी आलाे असल्याने राजकीय भाष्य करणार नाही. याबाबत विधानमंडळात बाेलणार आहे."
हेही वाचलंत का?