राजकीय सुडबुद्धीने कारवाई, ही राक्षसी हुकूमशाही; संजय राऊत यांचा घणाघात | पुढारी

राजकीय सुडबुद्धीने कारवाई, ही राक्षसी हुकूमशाही; संजय राऊत यांचा घणाघात

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर कडाडून हल्ला चढवला.

राजकीय सुडबुद्धीने कारवाई करून कोणतीही बाजू मांडू न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. तुम्हाला झुकवू शकतो हे दाखवून देण्यासाठी अशा कारवाया होत असल्याचा आरोप केला. केंद्रिय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नमवू शकतो अशा प्रकारे भाजपचे काम सुरू आहे. देशात ज्या ठिकाणी भाजप पराभूत झाला आहे त्या सर्वठिकाणी अशा कारवाया सुरू आहे. असे राऊत म्हणाले.

पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आमदार आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. ज्या राज्यात भाजपने सत्ता गमावली त्यांच्यावर अशाप्रकारे दबाव आणला जात आहे. हा सगळा कारभार हुकूमशाही कारभार आहे.

काल हाती आलेल्या माहितीनुसार युपीएच्या काळात २२ ते २३ ईडीच्या कारवाया झाल्या तर भाजपच्या काळात हजारो कारवाया झाल्या. असे राऊत म्हणाले.

श्रीधर माधव पाठणकर आमच्या परिवारातील एक व्यक्ती आहेत. श्रीधर पाठणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधु आहेत याचबरोबर ते आमच्या कुटूंबातील एक भाग आहेत. महाराष्ट्र झारखंड पश्चिम बंगाल या राज्यात जोरदार कारवाया सुरू आहेत.

Back to top button