‘हिरो मोटोकॉर्प’चे चेअरमन पवन मुंजाल यांच्‍या निवासस्‍थानासह ऑफीसवर आयकर विभागाचे छापे | पुढारी

'हिरो मोटोकॉर्प'चे चेअरमन पवन मुंजाल यांच्‍या निवासस्‍थानासह ऑफीसवर आयकर विभागाचे छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिरो मोटोकॉर्प कंपनीचे चेअरमन पवन मुंजाल यांच्‍या निवासस्‍थानासह कार्यालयावर आज सकाळी आयकर विभागाने छापे टाकले. त्‍यांचे घर व गुडगाव येथील ऑफिसमध्‍ये आयकर विभागाच्‍या पथकाची तपासणी सुरु आहे. मुंजाल यांनी लेखापरीक्षणात बोगस खर्च दाखवला असल्‍याचा आयकर विभागाचा आरोप आहे.

आज सकाळी मुंजाल यांच्‍या निवासस्‍थानासह कार्यालयावर आयकर विभागाने कारवाई केली. यामुळे उदयोग जगतामध्‍ये एकच खळबळ उडाली. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आयकर विभागाच्‍या पथकाने मुंजाल यांच्‍या निवासासह ऑफीसमधून काही कागदपत्रे ताब्‍यात घेतली आहे. याची तपासणी सुरु आहे.

हीरो मोटकॉर्प ही दुचाकी निर्मिती करणारी जगातील एक सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे. ही कंपनी ४० हून अधिक देशांमध्‍ये आपल्‍या उत्‍पादनाची विक्री करते. अशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतही तिचा विस्‍तार आहे. भारतामध्‍ये धावणार्‍या ५० टक्‍के दुचाकी याच कंपनीच्‍या आहेत. आयकर विभागाने या कंपनीचे चेअरमन मुंजाल यांच्‍यावर कारवाई करतान याचे पडसाद शेअर मार्केटमध्‍येही उमटले. हिरो मोटोकॉर्पचे शेअर २ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत.

हेही वाचलं का? 

 

Back to top button