आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे मानधन | पुढारी

आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे मानधन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मानधन :  नगरसेवक असलेल्या व आमदार व खासदार म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे.

मात्र आमदार झालेल्या पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांना नगरसेवक पदाच्या मानधनाचा मोह सुटल्याने दिसत नाही. ही मंडळी आजही नगरसेवक पदाचे मानधन घेत आहेत.

सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले आहेत त्यांची नावे, त्यांना मिळत असलेले मानधन व भत्ते तसेच, जे मानधन घेत नाहीत त्यांची नावे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिकेच्या चिटणीस खात्याकडे मागितली होती.

त्यावर खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर नगरसेवक पदाचे मानधन घेत नाहीत, अशी माहिती देण्यत आली. कोटक हे भाजपचे खासदार आहेत, तर कोरगावकर शिवसेनेचे आमदार आहेेत.

आमदार बनलेल्या रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा २५ हजार मानधन आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता दीडशे रुपये भत्ता दिला जातो.

हे ही वाचलं का? 

Back to top button