नवाब मलिक यांच्यानंतर आता पुढचा नंबर अनिल परब यांचा, किरीट सोमय्यांचा दावा | पुढारी

नवाब मलिक यांच्यानंतर आता पुढचा नंबर अनिल परब यांचा, किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब हे देखील ईडीच्या रडारवर असून पुढचा नंबर त्यांचा आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल. असा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

सोमय्या हे नवाब मलिक आणि अनिल परब यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगत होते. अखेर मलिक यांना अटक झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. परब यांच्या अटकेच्या दाव्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अटक सत्र वाढण्याची शक्यता आहे. असे किरीट सोमय्या म्‍हणाले.

दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातील आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक यांच्या अटकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित आहेत. ईडीकडून झालेल्या अटकेनंतर मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते.

हे ही वाचा  

Back to top button