पुणेकरांनो, ‘मिसळवार’च्या सेलिब्रेशनसाठी सज्ज व्हा! | पुढारी

पुणेकरांनो, ‘मिसळवार’च्या सेलिब्रेशनसाठी सज्ज व्हा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

येत्या 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी हे दोन्ही विकेंडचे दिवस पुणेकरांसाठी खर्‍या अर्थाने मिसळवार ठरणार आहेत. कारण दै. पुढारी आयोजित ‘महामिसळ महोत्सव पुणे 2022’ सुरू होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. हा महामिसळ महोत्सवाचा दिमाखदार सोहळा म्हात्रे पुलाजवळील सृष्टी लॉन्समध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत रंगणार आहे.

US Vs Russia : अमेरिका आणि कॅनडाने रशियावर लादले कडक आर्थिक प्रतिबंध

कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर पुणेकर खवय्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण या सावटाखाली होते. खवय्येगिरी, खाद्यभ्रमंतीला या काळात खीळ बसली होती. पण, आता मात्र सगळीकडे वातावरण खुलं झालंय. त्यामुळे येत्या शनिवार आणि रविवारी या पुढारी महामिसळ महोत्सवात सहकुटुंब मनसोक्त पोटोबा करता येणार आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार माफियांना मदत करताहेत : किरीट सोमय्या

कडधान्याची रस्सा असलेली उसळ, पोहे, भेळ किंवा फरसाण घालून पावासोबत असलेली मिसळ हा वास्तविक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. गेली अनेक दशके या मिसळीने खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलयं. खवय्यांची भूक छोटी असो वा मोठी, अनेकदा ही मिसळच मदतीला धावून येते. या मिसळीची चव आणि ती बनवण्याची पद्धत प्रांतवार बदलत जाते. अनेकजण त्यात विविध प्रकारचे पाककृती प्रयोग करून त्याची लज्जत वाढवतात. परिणामी, त्याचे रूपडे अधिकच खुलते आणि खवय्यांची रसनाही तृप्त करते.

Motivational Video : गायींच्या झुंडीला भिडला एकटा हंसपक्षी!!!

पुण्याची चवदार मिसळ, मुंबईची ठसकेबाज मिसळ, कोल्हापूरची झणझणीत तर्री असलेली मिसळ, अहमदनगर येथील गावरान मिसळीचा ठसका या सगळ्या मिसळीच्या प्रकारांनी आपले वेगळेपण खवय्यांच्या मनात कायमच जपलंय. या सगळ्या मिसळींचा आस्वाद घेण्याची संधी दै. ‘पुढारी’ने एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण राज्यभरातील पुणे, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगरमधील विविध ठिकाणच्या प्रसिद्ध 22 मिसळ स्टॉल्सचा समावेश या महामिसळ महोत्सवात आहे. त्यामुळेच चवीने खाणार, तो ‘पुढारी’ महामिसळ महोत्सवाला नक्की भेट देणार, यात शंका नाही.

Back to top button