जळगाव : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती | पुढारी

जळगाव : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

जळगाव पुढारी वृत्तसेवा : १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. २२) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेबर ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलाने पीडीत मुलीशी जवळीक साधून दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. मंगळवारी दि. २२ रोजी सकाळी पिडीत मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर मुलाचे नाव सांगून त्याने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून रात्री ९ वाजता तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून  पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Back to top button