

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस अंतराळात उड्डाण करून इतिहास घडवणार आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक रॉकेटसह अंतराळात झेप घेणार आहेत.
अधिक वाचा
बेझोस यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर सांगितले की, तो, त्यांचा भाऊ आणि एका लिलावाचा विजेता ब्लू ओरिजिनच्या "न्यू शेफर्ड" अंतराळ यानावर स्वार होतील. २० जुलै रोजी त्याचे प्रक्षेपण होणार आहे. टेक्सास येथून हा प्रवास सुरु होईल. अपोलो-11 चंद्रापर्यंत पोहोचण्याचा वर्धापनदिन 20 जुलै रोजीच साजरा केला जातो.
अधिक वाचा
बेझोस यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला सांगितले होते की, ते इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि आपली कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडायचे आहे.
बेझोसने इन्स्टाग्रामवर सांगितले की, अवकाशातून पृथ्वीकडे पाहणे आपल्याला बदलून टाकते. या ग्रहाशी असलेला आपला संबंध बदलतो. मी या प्रक्षेपणात सहभागी होऊ इच्छित आहे जी मला आयुष्यात करायची होती. तो एक थरार आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
हे ही वाचलं का?
पाहा PHOTOS : विठूरायांना फुलांमधील मनमोहक आरास
[visual_portfolio id="10374"]