मुंबई, पुढारी ऑनलाईन : "महाविकास आघाडीतले काही बोलके पोपट बोलताहेत. ठाकरे सरकारनं १५ महिने योग्य पाऊले उचलली नाहीत म्हणून ओबीसी आरक्षण गेलं. महाविकास आघाडीमुळे ओबीसीचं आरक्षण गेल्यानं महाआघाडीतील नेते बोलत नाहीत", अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीवर केली आहे.
भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपच्या ओबीसी जागरण अभियानाचा शुभारंभ झाला. त्यामध्ये फडणवीस म्हणाले की, "भाजप हाच खरा ओबीसी समाजाचा खरा पक्ष आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात बहुजनांचं राज्य आहे. ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम मोदींनी केलं आहे. भाजपच्या ओबीसी जागरण अभिनयानाला सुरूवात झाली आहे. कोरोना काळातही ओबीसी प्रश्नांवर भाजप आक्रमक होते. देशातील मंत्रीमंडळात ओबीसी मंत्री सर्वात जास्त आहेत", असंही फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले की, "ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. केंद्राकडून ओबीसीच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत", असंही ते म्हणाले.
ओबीसी जागरण अभिनयानाच्या शुभारंभामध्ये पंजका मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे गैरहजर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. असं सांगितलं जात आहे की, या कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
पहा व्हिडीओ : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरातील गुहा…