नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा: मुंबई त पाऊस जोर कायम आहे. यामुळे दुस-या दिवशीही अनेक वितरकांनी दूध उचलले नाही. यामुळे 'गोकुळ'चे ३० हजार लिटर तर 'वारणा'चे १५ हजार लिटर दूध डेअरीत परत आले. वितरकांनी दूधाची मागणी कमी केल्याने हा फटका बसला.
अधिक वाचा
सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन, चुनाभट्टी, अंधेरी, जोगेश्वरी, मिरा रोड, दहिसर, कफ परेड, वरळी, कांदिवली तर ठाण्यात कळवा, दिवासह इतर ठिकाणी सोमवारी पहाटे पाणी साचल्याने वितरकांनी दुधाची उचल केली नाही.
दुधाच्या गाड्या लवकर वेळेत पाठवल्यानंतर ही ग्राहक नसल्याने 'गोकुळ'चे ३० हजार लीटर तर 'वारणा'चे १५ हजार लीटर दूध डेअरीत परत आले. अनेक वितरकांनी रविवारचे शिल्लक असलेले दूध विक्री केले. मुसळधार पावसामुळे दुधाची मागणी घटल्याने वितरकांनी विक्रीचे प्रमाण कमी केले. त्याचा फटका दूध डेअरींना बसला आहे.
अधिक वाचा
गोकुळचे ७ लाख ७० हजार लीटरचा सोमवारी पुरवठा झाल्याची माहिती व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली. तर वारणाचे १ लाख ३५ हजार लीटरचा विक्री झाल्याचे वारणाचे जनरल मॅनेजर एस एम पाटील यांनी सांगितले. इतर दूधसंघालाही पावसामुळे असाच कमी अधिक फटका सहन करावा लागला आहे. दूध खरेदी करणा-या ग्राहकांमध्ये १५ टक्के घट झाली आहे. ही घट मुंबईत पाणी साचलेल्या भागात झाली आहे. अनेक वितरकांनी सकाळी एक तास केंद्र सुरू ठेवून शिल्लक दुधाची विक्री करत केंद्र बंद केली.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व भातसा या प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे.
गेल्या २४ तासात पाणीसाठयात १ लाख २८ हजार ९३ दशलक्ष लीटर इतकी वाढ झाली आहे. १८ जुलैला तलावातील पाणीसाठा २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लीटर इतका होता. १९ जुलैला हा पाणीसाठा ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहचला. शहराला दररोज सर्वाधिक १ हजार ८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही वाढत आहे.
हेही वाचल का?