भुसावळ : वीजवाहिनीला धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू | पुढारी

भुसावळ : वीजवाहिनीला धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतात काम करत असताना लोंबकळत्या वीजवाहिनीला धक्का लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भुसावळ तालुक्यातील बोहर्डी शिवारामध्ये आज दुपारी ही घटना घडली. शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटनेमुळे भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको केला.

अधिक वाचा :

याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर रामचंद्र सावळे (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास बोहर्डी शिवारातील शेतकरी भास्कर साळवे हे शेतामध्ये काम करत होते.

त्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युतवाहक तारा या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होत्या. त्या खाली लोंबकळत होत्या. याच स्तरावरून दुसऱ्या एलटी विद्युत वाहक ताराही गेल्या होत्या. त्या तारांच्या संपर्कात खालील लोंबकळणाऱ्या तारा आल्यामुळे यातही विद्युत प्रवाह वाहत होता.

अधिक वाचा :

परंतु भास्कर साळवे त्यांच्या लक्षात न आल्याने या विद्युत तारांचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बोहर्डी येथील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर रस्ता रोको केला.

यामुळे काही वेळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तातडीने वाहतूक सुरळीत केली आहे. सध्या वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

हे ही वाचा :

Back to top button