नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली | पुढारी

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली

मुंबई; पुढारी ऑनलाईन

कणकवलीतील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले आमदार नितेश राणे आणि माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. ही सुनावणी उद्या होणार आहे.

अ‍ॅड. शुभदा खोत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी त्यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता. राणे हेच हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी तोपर्यंत अटकेपासून दिलासा द्यावा अशी विनंती केली होती.

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने ३० डिसेंबर २०२१ रोजी फेटाळला होता. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन फेटाळला होता. राणे यांच्यावतीने अ‍ॅड शुभदा खोत यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका | Cover Song of Jai Bhim | Jay bhim movie

Back to top button