Prajakt Tanpure : नगरच्या पालकमंत्रिपदी मंत्री प्राजक्त तनपुरे ? - पुढारी

Prajakt Tanpure : नगरच्या पालकमंत्रिपदी मंत्री प्राजक्त तनपुरे ?

नगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नगर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे. मात्र, यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आले आहे. (Prajakt Tanpure)

दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली, तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. परंतु, मध्यंत्तरी त्यांनी नगरच्या पालकमंत्री पदाच्या आपल्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. (Prajakt Tanpure)

तेव्हापासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती. यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती. मुुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय, कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते, असेही विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button