नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंबंधी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून आरोग्य सुविधा केंद्रांवर वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्धतेच्या सुनिश्चिततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
रूग्णांच्या देखभालीसाठी सर्वच आरोग्य सुविधा तसेच किमान ४८ तास पुरेल एवढा वैद्यकीय ऑक्सिजन साठ्याचा बफर स्टाक ठेवावा. आरोग्य सुविधा केंद्रांवर द्रव्यरूपी वैद्यकीय ऑक्सिजनचे (एलएमओ) टँक मुबलक प्रमाणात भरलेली असावीत. टँकर रिफिल करण्यासाठी अखंडित पुरवठा सुरळित ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना पत्रातून देण्यात आल्या आहेत.
सर्व पीएसए संयंत्र पुर्णत: कार्यान्वित असावी. प्लांटच्या देखरेखीसाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात यावी. सर्व आरोग्य सुविधा केंद्रांवर ऑक्सिजन सिलेंडरची संख्या मुबलक प्रमाणात असावी. ऑक्सिजन सिलेंडरचा बॅकअप स्टाक तसेच मजबूत रिफिल यंत्रणा असावी.
रुग्णालयांमध्ये जीवनरक्षक उपकरणांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असावी. ऑक्सिजन नियंत्रण कक्षांना पुन्हा कार्यान्वित करण्याची सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :