

हाणेगाव (नांदेड); पुढारी वृत्तसेवा : ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणार्या मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. देगलूर तालुक्यातील देगलुर ते औरादरोडवरील हाणेगाव बसस्थानकजवळ ही घटना घडली.
अधिक वाचा –
तुकाराम हाणमंत येनगाले (वय २२, बेन्नाळ, ता. मुखेड) असे अपघात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा-
औरारहून देगलूरकडे मालवाहतूक ट्रक ( क्र. एम एच २६ एडी ३०३५) भरधाव वेगाने जात होता.
अधिक वाचा –
हाणेगाव बसस्थानकजवळ त्याने अचानक ब्रेक मारला. पाठीमागून मोटरसायकल येत होती.
बिदरहून हाणेगाव मागे बेन्नाळ गावाकडे मोटारसायकलस्वार जात होता. त्यावेळी ट्रक चालकाने अचानकपणे ब्रेक मारला.
तरुण ट्रकला पाठीमागून जाऊन आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मोहन कनकवले, चंद्रकांत पांढरे, विष्णू चामलवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ -कोयना धरणातून सोडलेले पडणारे पाणी लाल का आहे? काय आहे या लाल पाण्याचे रहस्य?ॉ