जालना, पुढारी वृत्तसेवा ः जागतिक कमॉडिटी बाजारात तेलबिया आणि खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचे भावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या एका वर्षात खाद्य तेलाच्या दरात तब्बल दुप्पटीने वाढ झाली होती. त्यानंतर खाद्य तेलात घट झाल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळत आहे. लिटर मागे ही घट पाच ते सात रुपये आहे. खाद्यतेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाची किंमत प्रतिकिलो पाच ते सात रुपये कमी केले आहे.
पावसाने दडी दिल्यामुळे मूग मोगर, उडीद, तूर डाळ, तांदळाच्या दरातही प्रति क्लिटंल 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे. इंडोनेशियाने पामतेल निर्यात करण्याची बंदी मागे घेतल्यानंतर देशात सुमारे दोन लाख टन कच्चे पामतेल भारतात पाठवण्यात आले आहे. भारतात पामतेलाची उपलब्धता वाढलेली आहे. त्यामुळे इतर खाद्यतेलाच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. गेल्या पाऊण महिन्यांत दिवसांत सोयाबीन तेल प्रतिकिलो सात ते आठ रुपयांनी घटले आहे. 20 जूनपर्यंत किरकोळ बाजारात पामतेल उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच तेलाच्या दरात घट झाली आहे.
गेल्या पाऊण महिन्यात 15 किलो सोयाबिनचा डब्बा 2,800 रुपये होता. तो आता 2500 रुपयावर आला आहे. त्याचा लाभ थोड्याफार प्रमाणात ग्राहकांना मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांनी दर कपात केली आहे. या निर्णयाने पामतेलाचा भाव 7 ते 8 रुपयांनी कमी झाला आहे. सूर्यफूल तेलाचा भाव 10 ते 15 रुपयांनी आणि सोयाबीन तेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. शाळा सुरू झाल्याने किराणा बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. परिणामी, बाजारात शांतता आहे. साखर स्थिर उन्हाळ्यात गहू, डाळीची खरेदीला चांगले दिवस असतात.
शाळा सुरू झाल्याने पुस्तके, शाळेचा पोषाख आणि शैक्षणिक साहित्य खरेदीवर ग्राहकांचा भर आहे . केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध आणल्याने साखरेचे भाव स्थिरावलेले आहेत. पावसाने दडी दिल्यामुळे किराणा धान्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. गव्हाचे भाव स्थिर आहेत
हेही वाचलंत का?