

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा: उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम हा सोमवारी (दि.27) येत आहे. दोन वर्षांनतर निघणा-या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सामील होणार असल्याने आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. उंडवडी सुपे गावातील विहिरी, कूपनलिका, तसेच मुक्कामाच्या ठिकाणाच्या परिसराची पाहणी करुन विहिरीतील पाणी, टाक्या, कूपनलिका यातील पाण्यात जलशुध्दीकरणासाठी टीसीएल योग्य प्रमाणात टाकून जलशुध्दीकरण करण्यात आले. गावातील हॉटेल तपासणी करून सूचना दिल्या.
डास होऊ नये म्हणून परिसर स्वच्छ करुन पाणी साचू नये यासाठी उपाययोजना केल्या. वारक-यांना वारीत अडचण येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी महेश रुद्राक्षी यांनी दिली. बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, प्राथमिक आरोग्य केंद्र शिर्सुफळ वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, आरोग्य सहायक गायकवाड, मदने, आरोग्य सेविका पाचंग्रे व सर्व आरोग्य कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा