नगर : निवृतीनाथ महाराज दिंडीमुळे भुसार, भाजीपाला बाजार बंद | पुढारी

नगर : निवृतीनाथ महाराज दिंडीमुळे भुसार, भाजीपाला बाजार बंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी जाणारा श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 24 ते 25 जून या दोन दिवसांसाठी नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर मुक्कामी थांबणार असून, 26 जून रोजी प्रस्थान करणार आहे. त्यामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भुसार, फळे व भाजीपाला बाजार तीन दिवस बंद राहाणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीसाठी दरवर्षीप्रमाणे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा कृषी समितीच्या भुसार, फळे व भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी राहात आहेत. या पालखी दिंडीत जवळपास 50 हजार वारकरी असतात. त्यामुळे यार्डवर मोठी गर्दी होऊन भुसार, फळे खरेदी व विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नगर बाजार समितीने शुक्रवार दि.24 ते रविवार 26 जून या तीन दिवसांसाठी बाजार समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार, फळे व भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय शनिवारी (दि.27) नेप्ती उपबाजार येथील कांदा लिलाव देखील बंद असणार आहे.

त्यामुळे भुसार, फळे, भाजीपाला व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी या तीन दिवशी शेतमाल विक्रीसाठी यार्डवर आणू नये, असे आवाहन अहमदनगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक किशन रत्नाळे, सचिव अभय भिसे, सहसचिव बाळासाहेब लबडे, सचिन सातपुते, संजय काळे, सयाजी काळे, भाऊ कोतकर यांनी केले आहे.

Back to top button