मकर संक्रांतीनिमित्त ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरात विशेष अलंकार महापूजा | पुढारी

मकर संक्रांतीनिमित्त ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरात विशेष अलंकार महापूजा

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात (दि 15) सोमवारी मकर संक्रांत निमित्त नागनाथ सायंकाळी पाच वाजता विविध आभूषणे घालून विशेष अलंकार महापूजा करण्यात आली.

यामध्ये नागनाथास पुतळ्याची माळ कर्णकुंडल सोन्या चांदीचा गोफ यासह विविध आभूषणे घालण्यात आली होती. या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी संस्थान सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार विठ्ठल परळीकर अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ गार्ड प्रमुख बबन सोनुणे जगदेव दिंडे दशरथ राठोड संजय मोरे नामदेव पाटील प्रवीण गोबाडे भगवान शिंदे देवा देशमुख यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत बंदोबस्त ठेवला होता. यावेळी कर्मचारी नागेश माने कृष्णा पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित.

Back to top button