Chhatrapati Sambhaji Nagar | आदर्श पतसंस्था ठेवीदारांचा मोर्चा; पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट | पुढारी

Chhatrapati Sambhaji Nagar | आदर्श पतसंस्था ठेवीदारांचा मोर्चा; पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असताना आज छत्रपती संभाजीनगर येथे आदर्श पतसंस्था गुंतवणूकदारांनी मोर्चा काढला. आदर्श पतसंस्थेत २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहेत. ठेवीदारांनी काढलेल्या या मोर्चाला पोलिसांनी गेटवर अडवले. खासदार इम्तियाज जलील हे या मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत. पोलिसांनी अडवल्यानंतरही हमखास मैदानाच्या दिशेने हा मोर्चा निघाला, तेव्हा पोलिसांनी बॅरिकेड लावून मोर्चा अडवला.

संबंधित बातम्या : 

सहकारमंत्र्यांनी येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी खासदार जलील यांनी केली. यावेळी त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक उडाली. (Chhatrapati Sambhaji Nagar) दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना सौम्य लाठीमार केला आहे. आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी गरिबांवर काय लाठीचार्ज करता, असे म्हणत पोलिसांना सुनावले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत मंत्रिमंडळ बैठकस्थळी जाण्याचा प्रयत्न केला.

या पतसंस्थेत ठेवीदारांच्या २०० कोटी रुपयांच्या ठेवी अडकले आहेत. रिझर्व्ह बँकेने या पतसंस्थेवर निर्बंध आणले आहेत. पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यासह सर्व संचालकांना पोलिसांनी अटक केली होती. मानकापे कुटुंबाची संपत्ती विकून आमच्या ठेवी परत करा अशी मोर्चेकर्‍यांची मागणी आहे.

हेही वाचा : 

Back to top button