Ajit Pawar News : लाखांच्या पोशिंद्यालाही चांगले जेवण मिळावे : अजित पवार | पुढारी

Ajit Pawar News : लाखांच्या पोशिंद्यालाही चांगले जेवण मिळावे : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘शेतकरी हा लाखांचा पोशिंदा असतो. त्याच्याकडून चालविल्या जाणार्‍या व्यवसायामुळे आज प्रत्येकाला अन्न मिळत आहे. समाजालातील प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी तो राबतो, त्यामुळे त्यालाही पोटभर चांगलं जेवण मिळालं पाहिजे,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत जेवण कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

व्यासपीठावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, संचालक अनिरुध्द ऊर्फ बाप्पू भोसले, संचालक संतोष नांगरे, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, गौरव घुले आदी उपस्थित होते.

या वेळी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांना अडतदार गटातून, तर व्यापार गटातून पंडीत आहेर यांना, हमाल गटातून किसन कानगुडे, तोलणार गटातून राजेश मोहोळ, टेम्पोचालक गटातून शंकर साबळे, पत्रकार गटातून प्रमोद जाधव यांना, तर बाजार समितीतील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून राजेंद्र घुले यांचा ‘शारदा गजानन आदर्श पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शारदा गजाननाची फ—ेम, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा पवार यांच्या हस्ते या वेळी गौरव करण्यात आला.

हेही वाचा

Nitin gadkari : नवं पुणं उभारा : शहराला प्रदूषण, वाहतूक कोंडीचा विळखा : नितीन गडकरी

Narendra Modi : पुणेकरांनी मोदींना दिल्या अनोख्या शुभेच्छा! धान्यापासून साकारले भव्य पोट्रेट 

Broccoli : ब्रोकोलीचे असतात अनेक फायदे

Back to top button