Shri Tuljabhavani Devi : श्री तुळजाभवानी देवीची दुसऱ्या माळेला नित्योपचार पूजा | पुढारी

Shri Tuljabhavani Devi : श्री तुळजाभवानी देवीची दुसऱ्या माळेला नित्योपचार पूजा

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीची नित्योपचार सोमवारी (दि.१६) पूजा करण्यात आली. रविवारी रात्री छबिना मिरवणूक झाली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Shri Tuljabhavani Devi)

सोमवारी पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीला अभिषेक करण्यात आला. आरतीनंतर देवीचे विविध धार्मिक विधी पार पडले. तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस १८ तारखेपासून विविध रूपातील पूजा होणार आहेत. पहिल्या दिवशी रथ अलंकार महापूजा, १९ रोजी ललीत पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, २० रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २१ रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि २२ ऑक्टोबररोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. (Shri Tuljabhavani Devi)

देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली असून प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन केले आहे.

हेही वाचा 

Back to top button