येरमाळा; पुढारी वृत्तसेवा : येरमाळा येथे मराठा आरक्षणासंदर्भात काल (दि. ४ ऑक्टोबर ) रोजी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कै. शहाजी कदम यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी संवाद सभा आयोजित केली होती. त्यानिमित्त रात्री उशिराने जरांगे पाटलांचे येरमाळ्यात आगमन झाले.
संबधित बातम्या
मनोज जरांगे पाटील यांनी कै. शहाजी कदम यांच्या कुटुंबाची भेट घेतली व उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलून रोख दहा लाख रुपये व कुटुंबातील एकास शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले व गावकऱ्यांनाही त्यांच्या कुटुंबाला काही कमी पडू देऊ नका असे आव्हान केले.
तसेच रात्रीचे दोन वाजता मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर येरमाळा गावातील व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजातील लोकांना मार्गदर्शन केले. तसेच आरक्षण तर आपणच घेऊ. फक्त समाजातील युवक मित्रांनो खचू नका, एकत्रित लोकशाहीच्या मार्गाने लढा द्या, संघटित रहा राजकीय लोकांच्या कुरघोड्यांना बळी पडू नका. आपल्या समाजाची एकजूट तुटू देऊ नका, असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
येरमाळा येथे मनोज जरांगे पाटलांचा ताफा रात्रीच्या दीड वाजता पोहोचला होता तरी येरमाळा परिसर सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचा यथोचित येडेश्वरीची प्रतिमा व भव्य हार घालून सन्मान सकल मराठा समाज येरमाळ्याच्या वतीने स्वागत केले. रात्रीचे दोन वाजले असतानाही बहुसंख्य स्थितीत येरमाळा येथे सकल मराठा कुणबी बांधव उपस्थित होते. 'एक मराठा लाख मराठा', 'मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है'. अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. रात्रीचे दोन वाजले असताना ही परिसरातील महिला, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :