बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मूळ गावात आमरण उपोषण सुरू | पुढारी

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मूळ गावात आमरण उपोषण सुरू

मातोरी: पुढारी वृत्तसेवा : मागील १४ दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे म्हणून मातोरी गावचे भूमिपुत्र मनोज जरांगे पाटील यांनी सराटे येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून मनोज जरांगे यांच्या जन्मभूमी मातोरी तालुका शिरूर येथे आज मंगळवारी ( दिनांक १२ सप्टेंबर ) रोजी आमरण उपोषणाला आणि साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

यामध्ये आमरण उपोषणाला बसलेले राधेश्याम आश्रजी जरांगे आणि बाप्पासाहेब सूर्यभान माने यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला. तर मातोरी धारवाडी येथील ग्रामस्थ साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू ठेवणार आहोत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून उपोषण सुरू ठेवणार असल्याचे समर्थन ग्रामस्थांनी केले आहे.

यावेळी मातोरी गावचे माजी पंचायत समिती सभापती रवींद्र जरांगे, मातोरी गावचे उपसरपंच सचिन माने, रोहिदास जरांगे शिवाजी जरांगे, तीर्थराज जरांगे, महादेव येवले, रोहिदास जरांगे, भागवत सुपेकर, सुदाम जरांगे, रामनाथ जरांगे, हनुमान घाटे, भागवत येवले, सर्जेराव जरांगे, राष्ट्रवादी शिरूर तालुका प्रमुख प्रल्हाद जरांगे आणि अन्य ग्रामस्थ साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू जगन्नाथ जरांगे यांचा साखळी पोषणात सहभाग

मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू जगन्नाथ जरांगे हे त्याच्या समर्थनार्थ म्हणून मातोरी येथे आजपासून सुरू झालेल्या आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. राधेश्याम आश्रजी जरांगे आणि बाप्पासाहेब सूर्यभान माने तर सर्व मातोरी आणि धारेवाडी ग्रामस्थ साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत. या उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू जगन्नाथ जरांगे बसल्याने त्यांना उस्फुर्तपणे पाठिबा दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button