जालना : मनोज जरांगे पाटील यांची मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी घेतली भेट | पुढारी

जालना : मनोज जरांगे पाटील यांची मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी घेतली भेट

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा काल (सोमवार) रात्री मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपोषण सोडण्याचा झालेला सर्वपक्षीय ठराव आणि बैठकीची माहिती घेवून राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी रोहयो मंत्री संदीपान भुमरे व माजी मंत्री अर्जुन खोतकर हे आज (मंगळवार) सकाळी अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांना सर्व माहिती दिली.

यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील तुमची राज्य सरकारला तसेच सर्व विरोधी पक्षाला आपली काळजी आहे. आपली काळजी घेण्यासाठी तसेच प्रकृती पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना रात्री उशीरा अंतरवालीत पाठवले होते. मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दयावा, सरकारशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा.

सोमवारी सर्वपक्षीय संयुक्त बैठक पहिल्यांदा झाली. आपल्या निर्णायासाठी सर्व पक्षांनी एकमताने ठराव संमत झाला. राज्य सरकाराने जी भूमिका घेतली आहे त्याला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. मराठा आंदोलकांवर दाखल खटले मागे घेण्यासाठी ठराव पास केला. सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी ठराव पास केला. तिन्ही अधिकारी निलंबित करून मराठा आरक्षणावर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मध्ये मनोज जरांगे यांनी किंवा ते देतील तो सदस्य घेण्यासाठीचा निर्णय घेतला असल्याचे खोतकर यांनी सांगितले. सरकारचे पत्र काही चर्चा करण्यासाठी तासाभराचा वेळ मागुन घेतला. पुन्हा येथे सरकारची भूमिका मांडणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

तर मनोज जरांगे म्हणाले, सरकारच्या वतीने जोपर्यंत माझ्यापर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत याबाबत बोलणं उचित नसुन पत्र आल्यावर आपली भूमिका मांडणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button