पुढारी ऑनलाईन डेस्क : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गेल्या काही दिवसांतील मृतांचा आकडा ४१ वर गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.५) मृत रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबाेल केला. (Nanded hospital death)
संबधित बातम्या
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्र सरकारकडे ईडी किंवा सीबीआय वापरून पक्ष फोडण्यासाठी पैसे आहेत; पण सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी पैसे नाहीत. काही औषधे अशी आहेत ज्यांची बिले नव्हती. सरकारने वेळेवर पैसे दिले न दिल्याने, नवीन औषधे उपलब्ध होत नाहीत. अशी अनेक पदे आहेत जिथे नियुक्त्या झाल्या नाहीत, काही पदोन्नती प्रलंबित आहेत. विजेची बिले भरलेली नाहीत. अनेक गोष्टी प्रलंबित आहेत, त्यामुळे या गोष्टी घडत आहेत. मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करते."
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूनंतर खासदार हेमंत पाटील मंगळवारी (दि.३) गेले होते. तेथे अधिष्ठातांच्या दालनात जाऊन त्यांनी अधिष्ठाता व अन्य डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाकोडे यांनी स्वतः पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.