Maharashtra Politics : दिल्ली वाऱ्या करायला वेळ; पण रुग्णालयांना…सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा | पुढारी

Maharashtra Politics : दिल्ली वाऱ्या करायला वेळ; पण रुग्णालयांना...सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. या परिस्थितीने राज्य हादरलं आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, ठाणे नंतर आता नागरपूरमधूनही मृत्यूचा आकडा समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय

सुप्रिया सुळे यांनी राज्यातील आरोग्य स्थितीवर भाष्य करणारी पोस्ट आपल्या ‘X’ खात्यावर शेअर करत सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”भय इथले संपत नाही’ आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता नागपुरात देखील २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत. औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय.

हेही वाचा 

 

Back to top button