Nanded Hospital death : नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या, ३०२ चा गुन्हा दाखल करा : नाना पटोले

नाना पटोले,www.pudhari.news
नाना पटोले,www.pudhari.news
Published on
Updated on

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: नांदेड व संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या घटना संताप आणणाऱ्या आहेत. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट, जाहिरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत, परंतु सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल करत सरकारी रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या असून ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Nanded Hospital death)

सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. (Nanded Hospital death)

राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली असून शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने ४० टक्क्यांची मलई खाण्यासाठी वेळेत औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे २०२२ मध्ये तरतूद केलेला ६०० कोटींचा निधी परत गेला, असा आरोप करत भाजपा सरकारने १५ ऑगस्टपासून राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरु केल्याचा मोठा गाजावाजा केला, पण रुग्णालयात सरकार सेवा देत नसून मृत्यू देत आहे. भाजप सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे, हेच यावरून दिसत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news