परभणी : कौसडी ग्रा.पं.च्या एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात | पुढारी

परभणी : कौसडी ग्रा.पं.च्या एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात

कौसडी; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी चौरंगी लढत होणार आहे. वार्ड क्रमांक सहामधील सदस्यपदासाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे. सोशल मीडियावर निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे.

या निवडणुकीसाठी भाजप गटाकडून सारिका ज्ञानेश्वर जीवने, राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून भाग्यश्री संतोष देशमुख, काँग्रेस गटाकडून रफत शेख इमरान आणि शिवसेना उद्धव गटाकडून बेबी हरिभाऊ पानझाडे या रिंगणात उतरल्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक सहामध्ये भाजप गटाच्या जाहेदा बी गफ्फार शेख या २७७ मतदान घेऊन ७७ मतांच्या लीडने निवडून आल्या होत्या. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही भाजपचा उमेदवार निवडून येईल, असा दावा भाजपचे नेते करत आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार असून गुरुवारी १८ मे रोजी मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद शाळा येथे सकाळी ७:30 ते सायंकाळी ५:30 वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेच्या दिवशी परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे बोरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button