

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य गेटवर बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याची कथित घटना घडली होती. यासंदर्भात एफआयआर नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी यावर्षीच्या घटनेसह गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करणार आहे.
हेही वाचा :