Aadhar card : तुमच्‍या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही .. जाणून घ्‍या 'या' बाबी - पुढारी

Aadhar card : तुमच्‍या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही .. जाणून घ्‍या 'या' बाबी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

आपली ओळख स्‍पष्‍ट करणारं आणि  जगण्‍यातील अविभाज्‍य भाग झालेले ओेळखपत्र अशी आधार कार्डची ( Aadhar card ) ओळख झाली आहे. आज मुलांच्‍या शाळेतील प्रवेशापासून बॅक खाते, गृह खरेदी अशा प्रत्‍येक ठिकाणी आधार कार्ड ( Aadhar card ) अनिवार्य आहे. मात्र  या कार्डचा गैरवापर तर होणार नाही, अशी शंका प्रत्‍येकाच्‍या मनात असते. तुमच्‍या आधार कार्डचा गैरवापर हाेवू नये, यासाठी यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) केलेल्‍या सूचना जाणून घेवूया ….

आधार कार्डचा गैरवापर होवू नये, असे वाटेल असेल तर आधार कार्डबराेबर तुम्‍ही वापर असलेला मोबाईल फोन नंबर अपडेट ठेवणे महत्‍वपूर्ण आहे. जर तुमचा मोबाईल नंबरच अपडेट नसेल तर आधार कार्डचा होत असलेल्‍या गैरवापराची माहिती तुम्‍हाला मिळणार नाही, असे ‘यूआयडीएआय’ने स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे आधार कार्डधारकांनी नेहमी आपला मोबाईल नंबर अपडेट ठेवावा.

आधारकार्ड तयार करतानाच तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, घराचा पत्ता याची माहिती घेतली जाते. मात्र बहुतांश जण व्‍यक्‍तिगत कामासाठी आपला मोबाईल नंबर बदलत असतात. मात्र ताे मोबाईल नंबर आधार कार्डला अपडेट केला जात नाही.

(Aadhar card ) मोबाईल नंबर आणि ईमेल कसे तपासाल  ?

सर्वप्रथम तुम्‍ही ‘युआयडीएआय’च्‍या अधिकृत संकेतस्‍थळ uidai.gov.in ओपन करा. यानंतर https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile यावर क्‍लिक करा.

जर तुम्‍ही युआयडीएआयच्‍या वेबसाईटवर गेला तर तुम्‍हाला My Aadhaar यावर क्‍लिक करावे.

यानंतर Aadhaar Services वर जावा. यामध्‍ये Verify Email/Mobile Number ला सेलेक्‍ट करा. यावर तुमचा १२ अंकी आधार नंबर टाईप करा.

यानंतर कॉन्‍टॅक्‍ट डिटेलमध्‍ये तुम्‍हाला तुमच्‍या मोबाईल नंबर आणि ईमेलची माहिती भरा. एक कोड नंबर येईल तो भरा. यानंतर send OTPवर क्‍लिक करा. तुमच्‍या मोबाईल नंबर आणि ईमेलवर एक ओटीपी येईल. यामुळे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आधारमध्‍ये नोंद आहे का, याची माहिती मिळेल.

आधार सेंटरवरच होईल मोबाईल अपडेट

आधारमध्‍ये मोबाईल नंतर अपडेट नसेल तर तुम्‍हाला जवळच्‍या आधार सेंटरवर जावूनच रजिस्‍टर अपडेट करावे लागेल. हे तुम्‍ही ऑनलाईन करु शकत नाही.

आधारसाठी मोबाईल फाेन नंबर कसा अपडेट कराल?

आधार कार्डसाठी मोबाईल नंबर अपडेट करण्‍यासाठी सर्वप्रथम तुम्‍हाला आधार सेंटरवर जावे लागले. येथे आधार कार्ड अपडेटचा फॉर्म भरावा. यामध्‍ये जो मोबाईल फोन नंबर अपडेट करायचा आहे त्‍याची नोंद करावी. हा फॉर्म आधार सेंटरवर जमा करावा. यावेळी सेंटरवरील कर्मचारी तुमची बायोमेट्रिक डाटाची पडताळणी करेल. यानंतर तुम्‍हाला एक पावती मिळेल. यामध्‍ये अपडेट विनंती नंबर ( युआरएन ) लिहिलेला असेल. या नंबरच्‍या मदतीने तुम्‍ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट झाला आहे का, याची माहिती मिळेल.

त्‍याचबरोबर ‘यूआयडीएआय’ टोल- फ्री नंबरवर कॉल करुन तुम्‍ही तुमचे आधार कार्ड अपडेट स्‍टेटसची माहिती घेवू शकता.

हेही वाचलं का?

 

Back to top button