कोरोना रुग्णांची जगभरात घटत आहे संख्या - पुढारी

कोरोना रुग्णांची जगभरात घटत आहे संख्या

जिनिव्हा ः जागतिक आरोग्य संघटनेने एक सुखद वृत्त दिले आहे. जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने घटत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. साप्‍ताहिक ‘कोव्हिड-19’ रुग्ण व मृत्यू यांच्या संख्येत वैश्‍विक स्तरावर घट झाली आहे. विशेषतः आग्‍नेय आशियात ही घट अधिक दिसून आली आहे.

या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या ‘कोव्हिड-19’ साप्‍ताहिक अपडेटमध्ये म्हटले आहे की 20 ते 26 सप्टेंबरदरम्यान 33 लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले तर 55 हजारांहून अधिक मृत्यू झाले. ही संख्या त्याच्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत दहा टक्के कमी आहे. वैश्‍विक स्तरावर साप्‍ताहिक ‘कोव्हिड-19’ रुग्ण व मृत्यू यांच्यामध्ये घट होत आहे. नव्या साप्‍ताहिक पाहणीत सर्वाधिक घट भूमध्य क्षेत्रात (17 टक्के) नोंदवली आहे. त्यानंतर पश्‍चिम प्रशांत क्षेत्र (15 टक्के), अमेरिकन क्षेत्र (14 टक्के), आफ्रिकन क्षेत्र (12 टक्के) आणि आग्‍नेय आशियाई क्षेत्र (10 टक्के) इतकी आहे. युरोपियन क्षेत्रात गेल्या आठवड्यासारखीच स्थिती आहे. जगभरात झालेल्या मृत्यूंमध्येही युरोपियन व आफ्रिकन क्षेत्र सोडले तर सर्वत्र 15 टक्क्यांनी घट झाली आहे.

Back to top button