Gold Price Today : सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर | पुढारी

Gold Price Today : सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सोने- चांदी दरात गेल्या काही दिवसांत घसरण झाली. दरम्यान, आज मंगळवारी (दि.२१) सोन्याच्या दरात काही प्रमाणात तेजी दिसून आली. काल सोमवारी (दि.२०) २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति १० ग्रॅम ४६,२८२ रुपयांवर आला होता. आज सोन्याचा दर १२२ रुपयांनी वाढून ४६,४०४ रुपयांवर पोहोचला.

चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे. चांदीचा सध्याचा प्रति किलो दर ५९,६६१ रुपये एवढा आहे.

दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,४०४ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,२१८ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,५०६ रुपये, १८ कॅरेट ३४,८०३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,१४६ रुपये होता. (हे दर दुपारपर्यंतचे अपडेटेट असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)

दरम्यान, एमसीक्सवर (MCX) गोल्ड फ्यूचर्समध्ये घसरण दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा प्रति १० ग्रॅम ४६,२३३ रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दर घसरून प्रति औंस १,७६४ डॉलरवर आला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मन उडू उडू झालं अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत बरोबर गणपती मूर्ती बनवण्याची स्पर्धा!

Back to top button