नोंदणी व मुद्रांक अराजपत्रित अधिकारी,कर्मचारी बेमुदत संपावर | पुढारी

नोंदणी व मुद्रांक अराजपत्रित अधिकारी,कर्मचारी बेमुदत संपावर

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : मुद्रांक अराजपत्रीत अधिकारी-कर्मचारी संघटना संप : नोंदणी व मुद्रांक अराजपत्रीत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी मंगळवार पासून संप पुकारला आहे.

याला राजपत्रित अधिकारी संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे दस्तनोंदणी ठप्प झाली आहे. राज्यातील बहुतांशी नोंदणी कार्यालयात हीच परिस्थिती कायम आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या सदस्यांनी कोल्हापुरातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत.

 २१ सप्टेंबर पासून बेमुदत संप करनार…

याबाबत अधिक माहिती अशी, नोंदणी व मुद्रांक अराजपत्रीत अधिकारी/कर्मचारी संघटनेने अप्पर मुख्य सचिव महसुल मुद्रांक शुल्क व नोंदणी महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना याबाबत रितसर नोटीस दिली आहे. अप्पर मुख्य सचिव महसूल, मुद्रांक व नोंदणी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यासोबत ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या चर्चेत दिलेल्या आश्वासनातील कोणत्याही मागण्यांची पुर्तता न झाल्यामुळे संघटनेचे सर्व सदस्य २१ सप्टेंबर पासून बेमुदत संप करनार असल्याचे निवेदन यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

   सुमारे १९०० सदस्य या संपामध्ये सहभागी

नोंदणी व मुद्रांक राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना ‘गट क’ चे सुमारे १९०० सदस्य या संपामध्ये सहभागी झाले आहेत. याला राजपत्रित अधिकारी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी रात्री आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संप आणि पितृपंधरवड्यास प्रारंभ यामुळे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश निबंधक कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

२१ मागण्यांवर संघटना ठाम

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील प्रलंबित पदोन्नत्या त्वरीत कराव्यात. विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत. कोवीड मुळे मयत झालेले विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे कुटूबियांना तत्काळ ५० लाखाची मदत मिळावी व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घ्यावे. यासह २१ मागण्यांवर संघटना ठाम आहे.

हे ही पाहा : __

अभिनेत्री अदिती सारंगधरने बनवला फक्कड चहा

Back to top button