मुंडे प्रकरण : करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला | पुढारी

मुंडे प्रकरण : करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी शनिवारी होणार होती. पंरतु आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या कोर्टासमोर वीस जामीन अर्ज सुनावणीसाठी आले होते. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शर्मांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत करुणा शर्मा उर्फ करुणा मुंडे परळीत आल्या होत्या. मात्र याठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. करुणा शर्मा यांनी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी शनिवारी ( दि.१८) होणार होती.

मात्र, अति. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांच्या टेबलवर जामिनासाठी वीस अर्ज आले होते. करुणा शर्मांचा अर्ज वीस नंबर असल्याने जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता सोमवारी सुनावणी होणार असून शर्मांचा कोठडीतील मुक्काम अजून वाढला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर | Ganesh Festivel Special |

Back to top button