जवळाबाजार येथे अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये करणार प्रवेश | पुढारी

जवळाबाजार येथे अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये करणार प्रवेश

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये जवळाबाजार येथे अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. येथे एम आय पी एज्युकेशन सोसायटी परिसरात जवळाबाजार व परिसरातील अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील.

१७ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदी उपस्थित असतील. दुपारी अडीच वाजता एमआयपी एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात पक्ष प्रवेश सोहळा होईल.

राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलेय.

यावेळी हिंगोली जिल्ह्याचे पालक मंत्री वर्षा गायकवाड प्रथमच जवळाबाजार नगरीमध्ये येत आहेत.

त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येतेय.

हेही वाचलं का?

Back to top button