पिंपरी : निवृत्त एसीपी असल्याची धमकी देत शिक्षिकेवर बलात्कार | पुढारी

पिंपरी : निवृत्त एसीपी असल्याची धमकी देत शिक्षिकेवर बलात्कार

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: ‘’मी रिटायर एसीपी आहे, तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत एकाने शिक्षिकेवर बलात्कार केला. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

विकास अवस्ती (रा. पिंपळे गुरव), असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. १०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिक्षिका म्हणून नोकरी करीत असताना तिला पैशांची अडचण होती.

त्यामुळे त्यांनी आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली. दरमहा १० टक्के व्याजाने पैसे देतो,

असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोऱ्या धनादेशांवर सह्या घेतल्या.

त्यानंतर फिर्यादीला शितपेय देऊन जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले.

तसेच तिला पैसेही दिले नाहीत.

अवस्थी हा संबधित महिलेल्याच्या शाळेत जाऊन तिला सोबत चलण्याचा आग्रह केला.

मात्र, तिने नकार देताच ‘तू जर सोबत आली नाहीस तर विवस्त्र अवस्थेतील फोटो शाळेत आणि तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो,’ अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपी हा फिर्यादीला दुचाकीवरून बसवून घेऊन गेला. फिर्यादीने प्रतिकार केला.

पीडितेला धमकी

‘तू जर ओरडलीस तर , तू जर कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, मी रिटायर एसीपी आहे,

माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी धमकी देऊन आरोपीने जबरदस्तीने शिक्षिकेवर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

अत्याचार प्रकरणानंतर आणि अवस्ती देत असलेला त्रास पाहून महिलेने पोलिस ठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करत आहेत.

‘आरोपीने निवृत्त एसीपी असल्याचे फिर्यादी महिलेला सांगितले आहे. मात्र, आरोपी हा पोलिस खात्याशी संबंधित असून तो अन्य कोणत्यातरी खात्यातून निवृत्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे.’
– सुनील टोनपे, वरिष्ठ निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे.

हेही वाचा :

Annaatthe rajnikant : रजनीकांत, जयकांत शिक्रे पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयपीएस अधिकारी मंत्र्याएवजी मला का भेटतात?

राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…

नाशिक : जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला जोरदार विरोध

Back to top button