बीड : लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा, पीडिता ८ महिन्यांची गरोदर | पुढारी

बीड : लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा, पीडिता ८ महिन्यांची गरोदर

गेवराई (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपुर्वी अपहरण करून पीडितेवर बलात्कार केला असल्याची फिर्याद गेवराई पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच तपासात मोठा खुलासा झाला होता की, पीडित अल्पवयीन मुलगी ही सात ते आठ महिन्यांची गरोदर होती. ही धक्कादायक बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्या चुलतीसोबत गेवराई याठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी १६ वर्षीय मुलगी आली होती. येथे दोन मुलांनी तिचे अपहरण करून तिच्यावर बीड याठिकाणी एका कॉफीशॉपमध्ये अत्याचार केला. ही माहिती पीडितेने गेवराई पोलिसांना दिली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. तसेच अंबड या तालक्यातून गेवराई तालुक्यात शेतात सालाने काम करण्यासाठी हे कुटुंब आले होते. पीडित अल्पवयीन आहे. ती सात ते आठ महिन्याची गरोदर असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी कसून तपास करून योग्य ती कार्यवाही करू, असे पोलिस उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी सांगितले आहे.

Back to top button