पिंपरी : व्यापार्‍याला 14 लाखांचा गंडा | पुढारी

पिंपरी : व्यापार्‍याला 14 लाखांचा गंडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मका खरेदी केल्यानंतर पैसे न देता एका व्यापार्‍याची 14 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 9 नोव्हेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 या कालावधीत छिंदवाडा, मध्य प्रदेश आणि घोजादंगा, पश्चिम बंगाल येथे घडला. दिलीप दशरथ राजीवडे (49. रा. यमुनानगर, निगडी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. 30) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अशोक घोष (रा. बांगलादेश), रणजीत सिंग ऊर्फ अखिलेश मौर्य (रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती उत्पादनांचे आयात- निर्यात करतात. आरोपींनी ऑनलाईन माध्यमातून फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 57 हजार रुपये किमतीची मका घेतली. त्यानंतर मक्याचे पैसे न देता आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button