परभणी : मानवत पोलीसांकडून २२ लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

परभणी : मानवत पोलीसांकडून २२ लाखांचा गुटखा जप्त

मानवत : पुढारी वृत्तसेवा : येथील पोलीसांच्या पथकाने लोणार येथे १९ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त केला. या गुन्ह्यात आतापर्यंतच्या तपासामध्ये २२ लाख ६७ हजार ४७९ रुपयांचा गुटखा ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे .

पुणेः  सनदी अधिकार्‍यांच्या ओळखीचा फंडा अन् अभियंत्याला 48 लाखाचा गंडा

याबाबत माहिती अशी की, येथील पोलीसांच्या पथकाने गस्ती दरम्यान गुटखा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. तपासा दरम्यान या आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला पाथरी येथे छापा टाकत ६३ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर त्या पाथरीच्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कारवाई करत १लाख ९० हजार रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला . या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना मानवत पोलीसांना लोणार येथे एका शेतातील आड्यावर मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली.

संगमनेर : पैसे लुटल्याच्या बनावप्रकरणी दोघे ताब्यात

या  माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, सपोनि फिरोज पठाण, पोलीस कर्मचारी सय्यद इरशाद अली, सिध्देश्वर पाळवदे, शरिफ पठाण, समीर पठाण यांच्या पथकाने लोणार येथे कारवाई करत १९ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा गुटखा मंगळवार  २१ रोजी जप्त केला. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत २२ लाख ६७ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button