कमलनाथ यांनी घेतली शरद पवार यांची भेट | पुढारी

कमलनाथ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही भेट झाली.मात्र, राज्यातील राजकीय हालचालीचा या दोन नेत्यांच्या भेटीशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार दिला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कमलनाथ यांनी पवार यांची भेट घेतली असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

 

Back to top button