हिंगोली : डोक्‍यात दगड घालून महिलेचा खून | पुढारी

हिंगोली : डोक्‍यात दगड घालून महिलेचा खून

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : औंढा तालुक्यातील टेंभूरदरा येथे एका महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. अहिल्याबाई खुडे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतीच्या वादातून खून झाला असल्याची प्राथमिक माहीती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुरदरा येथे अहिल्याबाई व त्यांची सून शांताबाई या कुटुंबियांसह आखाड्यावर राहतात. रविवारी किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात शांताबाई यांना काहीजणांनी मारहाण केली होती. सोमवारी सकाळी शेतकर्‍यांना अहिल्याबाई यांचा मृतदेह आखाड्याजवळ आढळून आला. त्यांच्या तोंडावर व डोक्यावर वार करण्यात आले होते. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख, कळंबोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार चाटसे, प्रशांत शिंदे, वाखारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेतीच्या वादातून खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button