सांगली : म्हैसाळमध्ये कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्‍महत्‍या | पुढारी

सांगली : म्हैसाळमध्ये कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्‍महत्‍या

मिरज : पुढारी वृत्तसेवा
म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. दरम्‍यान, कर्जाला कंटाळून ९ जणांनी आत्‍महत्‍या केली असावी, असा संशय पाेलिस सूत्रांनी व्‍यक्‍त केले आहे.

म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

पशुवैद्यकीय डॉक्टर  त्यांच्यासह कुटुंबातील अन्य कोणीही मोबाईल उचलला नाही. ग्रामस्थांना शंका आल्यानंतर ग्रामस्थाने घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी डॉक्टरांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू अशा एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  सर्वांचा मृत्यू हा विषबाधेतून झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. कर्जाला कंटाळून ९ जणांनी आत्‍महत्‍या केली असावी, असा प्राथमिक अंदाज  पाेलिस सूत्रांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button