Aurangabad : महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेचे यजमानपद औरंगाबादला

Aurangabad : महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेचे यजमानपद औरंगाबादला

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेचे यजमानपद औरंगाबादला (Aurangabad) देण्याचा निर्णय महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पार पडेल, अशी माहिती राष्ट्रीय ॲथलेटिक महासंघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष तथा ऑलिम्पियन आदिल सुमारीवला यांनी आज (दि.18) पत्रकार परिषदेत दिली.

सुमारीवाला म्हणाले, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेची दोन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण सभा औरंगाबाद येथे दि. 17 व 18 रोजी पार पडली. शुक्रवारी (दि.17) पहिल्या दिवशी संघटनेची कार्यकारी समितीची बैठक झाली. शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पर्धांचे वेळापत्रक एकमताने अंतिम करण्यात आले. बैठकीला राज्यातील तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत डोपिंग आणि वयोमर्यादा या दोन विषयांवरही सखोल चर्चा झाली.

सर्व नियमांची अंमलबजावणी ही जिल्हास्तरावर काटेकोरपणे करावी. ज्यामुळे पुढील स्पर्धांमध्ये खेळाडूंचे नुकसान होणार नाही. अशा सूचनाही देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव सतीश उचील, सहसचिव पंकज भरसाखळे, खजिनदार माधव शेजवळ, औरंगाबाद जिल्हा सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. दयानंद कांबळे यांची उपस्थिती होती.

औरंगाबादच्या साक्षी चव्हाणचा सत्कार

४×१०० रिलेच्या माध्यमातून खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या औरंगाबादच्या साक्षी चव्हाणचा सत्कार यावेळी महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेतर्फे करण्यात आला. संघटनेचे सहसचिव पंकज भरसाखळे यांच्या वतीने तिला 11 हजारांचा धनादेश सुमारीवाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news