

पिंपरी : कारमध्ये ठेवलेले अडीच लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी नेले. ही घटना बुधवारी (दि. 16) रावेत गावठाण येथील भोंडवे लॉन्स येथे घडली. याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रावेत गावठाण मधील भोंडवे लॉन्स येथे हळदी समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भावाच्या कारमध्ये दागिने ठेवले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ते चोरून नेले.