औरंगाबाद : कार अपघातात बीडच्‍या स्त्री रोग तज्ज्ञासह महिला वैद्यकीय अधिकारी जखमी | पुढारी

औरंगाबाद : कार अपघातात बीडच्‍या स्त्री रोग तज्ज्ञासह महिला वैद्यकीय अधिकारी जखमी

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : भरधाव कारला झालेल्‍या अपघातात बीड जिल्हा रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञासह महिला वैद्यकीय अधिकारी गंभीर जखमी झाल्‍या. ही दुर्घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता. पैठण) गावाजवळील एका  वळणावर आज (दि.१८) सकाळी घडली. स्ञीरोग तज्ज्ञ  डॉ. रामेश्वर आव्हाड आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मितल निवृत्ती लांभोरे असे गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांची नाव आहेत.

या बीड जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील स्ञीरोग तज्ज्ञ डॉ. आव्हाड आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. मितल लांभोरे  कामानिमित्त कार (क्रमांक एमएच २३ एस ९२९४) मधून बीडहून औरंगाबादकडे जात होते. यावेळी पाचोडपासून आठ किमी अंतरावर असणाऱ्या जावळे आडगाव (ता. पैठण) गावानजीकच्या एका वळणावर येताच डॉ. आव्हाड यांचा भरधाव कारवरील अचानक ताबा  सुटला. कार सरळ रस्त्यावरून पलिकडे जाऊन एका खड्ड्यात उलटली. या दुर्घटनेत डॉ. मित्तल लांभोरे यांच्या डोक्यासह हातपायांना जबर मार लागला. डॉ. आव्हाड यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, महामार्गावरुन मुलासमवेत दुचाकीवरुन  जात असताना जामखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक श्रीमती आर. एस. शेख यांनी अन्य वाहनधारकांना थांबवित अपघातग्रस्त जखमींना तातडीने कारमधून बाहेर काढले. त्यांना औरंगाबादच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण, रविंद्र आंबेकर करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button